Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : चाळीस गावं काय ? ४० इंच जमीन देखील कर्नाटकला घेता येणार नाही..

Jagdish Pansare

औरंगाबाद : कर्नाटकचे मुख्यमंत्री हे आगलावेपणा करतायेत, महाराष्ट्रातील चाळीस गांव त्यांच्या राज्यात घेण्याची भाषा त्यांनी केली आहे. पण चाळीस गावं काय, त्यांना ४० इंच जमीन देखील महाराष्ट्राची घेता येणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमावर्ती भागातील वाद आणि लढा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. (Maharashtra) महाराष्ट्राकडून सीमावर्ती भागातील ८६५ मराठी भाषिक गांव महाराष्ट्रात सहभागी झाली पाहिजे यासाठी कर्नाटक सरकार आणि न्यायालयात देखील सरकारकडून वेळोवेळी भूमिका मांडली जात आहे. (Shivsena) असे असतांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले हा आगलावेपणा असल्याचा टोला देखील दानवे यांनी लगावला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नाचा गुंता सुटलेला नसतांना कर्नाटक सरकारने आता थेट महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यावर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीच या संदर्भात विधान केल्याने महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. केले आहे. यामुळे राजकीय वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी भाग आहे. या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई असते. यामुळे इथल्या चाळीस पंचायतींनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केलाय. याच ठरावावरती आता कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे विधान बसवराज बोम्मई यांनी केले आहे. यावरून आता राज्यातील वातावरण तापले आहे.

विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर उच्चधिकार समिती गठीत करण्यात आली होती. त्यानंतर लगेच कर्नाटक सरकारकडून नवा दावा करण्यात आला.

यावर अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी तोडगा काढावा, असे प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी कर्नाटकांच्या मख्यमंत्र्यांनी हा आगलावेपणा केला आहे. महाराष्ट्रातील ४० गावे काय पण त्यांना चाळीस इंच देखील जमीन घेता येणार नाही, याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT