Yuvasena Chief Aditya Thackeray
Yuvasena Chief Aditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : अजून काय हवे होते ? भुमरेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे कडाडले.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भुमरेंना शिवसेनेने सहावेळा विधानसभेची उमेदवारी दिली, ते पाच वेळा आमदार आणि आता त्यांना मंत्री केले होते. अजून काय हवे होते ? कशासाठी (Shivsena) शिवसेनेशी गद्दारी केली ? अशा शब्दात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार माजीमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात त्यांच्यावर हल्ला चढवला. तुमच्या मतदारसंघात तीनशे कोटींपेक्षा जास्त निधी दिला, शिवसेनेने तुम्हाला प्रेम दिले हेच आमचे पाप झाले का? असा संतप्त सवाल देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला.

भुमरे यांच्या मतदारंसघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसैनिक आणि नागरिकांचा देखील त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला. (Aurangabad) बिडकीनमध्ये आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळी होती. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधतांना आदित्य ठाकरे म्हणाले, संदीपान भुमरे हे मंत्री होते, उद्धव साहेबांनी त्यांना कॅबिनेटमंत्री केले, पाच-सहावेळा विधानसभेची उमेदवारी दिली. मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी दिला.

संत ज्ञानेश्वर उद्यानाचे सौदर्यीकरण जागितक दर्जाचे व्हावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो. जायकवाडी धरणापासून त्यांच्या मतदारसंघातील गावांसाठीच्या पाणी योजनेला आपल्या सरकारने मंजुरी देऊन कोट्यावधींचा निधी दिला. संतपीठ सुरू केले मग यांना निधी मिळाला नाही, मतदारसंघात विकासकामे होत नाहीत हे म्हणायला कुठे वाव आहे. तुम्हाला शिवसेनेने आणखी काय द्यायला हवे होते, कशासाठी शिवसेनेशी गद्दारी केली ?

माझ त्यांना एकच आव्हान आहे, त्यांना जायचंच होतं तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवावे. शिवसेना कोणाच्या पाठीशी आहे हे आजच्या गर्दीने आणि शिवसैनिक, सामान्य नागरिकांच्या स्वागताने आणि प्रेमाने दाखवून दिले आहे. या सगळ्या संकटावर मात करून शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहील, असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यात शिवसेनेच्या ज्या आमदारांनी गद्दारी केली, ती राक्षसी महत्वाकांक्षेतून झाली आहे, शिवसैनिक त्यांना याचा धडा निश्चितच शिकवतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT