Chhatrapati Sambhajinagar Crime News:
Chhatrapati Sambhajinagar Crime News: Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Crime News: धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणुन मुस्लिम मुलीला भररस्त्यात मारहाण...

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीला तिच्याच नातेवाईकांनी भर रस्त्यात तिला प्रचंड त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime news) संबंधित मुलीचा मोबाईलही या त्या टोळक्याने काढून घेत तिला त्रास दिला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. (Shocking! A Muslim girl was severely beaten up for walking with a Hindu boy)

या घटनेचा व्हिडीओ व्हायरलं झाल्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील एक तरुणी रस्त्याने चालली असताना त्या मुलीची छेड काढत तिला काही टवाळखोर तरुण त्रास देताना दिसत आहे. हे तरुण तिचा फोन हिसकावून घेत तिला शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Marathwada Crime news)

एबीपी माझा वृत्तवाहिनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही घटना २४ तारखेची असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या आई वडीलांनी हे अपापसातील प्रकरण असल्याचे सांगत याबद्दल तक्रार देण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या एका मित्राबरोबर फिरायला गेली होती. यावेळी पिडीत मुलीच्या ओळखीच्या तरुणांनी तिची रस्त्यावर छेड काढण्यास सुरुवात केली. तो मुलगा कोण आहे, अशी विचारणा करत तिला भररस्त्यात मारहाणही करण्यात आली. टवाळखोरांनी तिचा बुरखाही फाडला. ही घटना घडत असताना तिच्यासोबत असलेले मित्र मैत्रिणीही निघून गेले. त्यानंतर या टोळक्याने मुलीचा पाठलाग करत तिला भर रस्त्यात त्रास देत तिला मारहाण केली. विशेष म्हणजे तरुणीला मारहाण करणाऱ्या टोळक्यातीलच एकाने तो व्हिडीओ काढल्याचे दिसत आहे. (Hindu-Muslim Politics)

दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनीच या गांभीर्य पाहाता तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हे तरूण त्या मुलीच्या ओळखीतील तसेच तिच्या घराच्या बाजूलाच राहणारे असावेत, अशी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT