Shivraj Patil Chakurkar Sarkarnama
मराठवाडा

Shivraj Patil Chakurkar's Brother Suicide : खळबळजनक! काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

Congress News : व्हाटस् अप स्टेटस ठेवत पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन...

सरकारनामा ब्यूरो

Chadrashekhar Patil Chakurkar News : काँग्रेस नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी परवानाधारक पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. पाटील हे 81 वर्षांचे होते. पाटील यांच्या आत्महत्येनं लातुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी(दि.५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्यातच चंद्रशेखर पाटील चाकूरकर (Chadrashekhar Patil Chakurkar) यांनी बंदुकीतून स्वत: वर गोळी झाडत जीवन संपवलं आहे. लातूर येथील आदर्श कॉलनी वास्तव्याला होते. दररोज ते सकाळी वॉकला बाहेर जात असत. त्यानंतर ते शिवराज पाटील यांच्या घरी येत असत. हा त्यांचा नियमित कार्यक्रम होता.

चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहत होते. तसेच त्यांची बायपास झाली होती. यातच ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. ते सततच्या आजारपणालाही कंटाळले होते. यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले असावं. सकाळी त्यांनी अनेकांना 'गूड बाय' असा मेसेज पाठवला होता. काहीवेळाने त्यांनी व्हॉट्सअॅपवरही गूड बाय असा स्टेटस ठेवला होता.

त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली अशी माहिती चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांना दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली अशी माहिती चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांना दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar)यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे रविवारी सकाळी घरातच होते. नित्याप्रमाणे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे घरात आल्यावर त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने गोळीचा मोठा आवाज झाला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांना चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास लातूर पोलीस करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT