Sugarcane Farmer Suicide in Beed District
Sugarcane Farmer Suicide in Beed District Sarkarnama
मराठवाडा

धक्कादायक : दोन एकर ऊस पेटवून शेतकऱ्याने घेतला गळफास

वैजीनाथ जाधव

गेवराई : जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती. मात्र, अतिरिक्त ऊस गाळपाच्या नियोजनासाठी सरकारने कुठलेही ठोस उपाय केले नाहीत. (Beed) परिणामी जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी अतिरिक्त ऊसाचा बळी बुधवारी (ता. ११) जिल्ह्यात गेला. ऊसाचे गाळप होत नसल्याने शेतकऱ्याने (Farmer) ऊसाचा फड पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हिंगणगाव (ता. गेवराई) येथे दुपारी घडली.

नामदेव आसाराम जाधव (वय ३०, रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात चार सहकारी आणि दोन खासगी सहकारी साखर कारखाने (Sugarcane) ऊसाचे गाळप करत आहेत. अद्यापही या सर्व कारखान्यांचे गाळप सुरु आहे. (Marathwada)

दरम्यान, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याचा अंदाज वर्षभरापूर्वीच लागलेला असताना शासन स्तरावर कुठल्याही ठोस उपाय योजना झाल्या नाहीत. त्यामुळे आजघडीला पाच लाख हेक्टरांहून अधिक क्षेत्रावर ऊस उभा आहे. आणखी फारतर पंधरवाडा कारखान्यांचे गाळप सुरु राहील.

हिंगणगाव (ता. गेवराई) येथील नामदेव जाधव यांचा दोन एकर क्षेत्रावर ऊस आहे. ऊसाचे गाळप होत नसल्याने ते हवालदिल होते. याच नैराश्येतून त्यांनी बुधवारी ऊसाचा फड पेटवून दिला आणि शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावला. दरम्यान, हिंगणगाव येथील १०१ हेक्टरांवरील ऊसाची नोंद जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडे होती.

नोंद असलेला सर्व ऊस गाळप झाला आहे. येथीलच नोंद नसलेला २५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप केला आहे. नामदेव जाधव यांचा नोंद नसलेला ऊस देखील गाळपाचे नियोजन होते. त्यांनी मागच्या वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याला ऊस पाठविल्याची माहिती, जयभवानी कारखान्याच्या पत्रकात देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT