Shocking! Parbhani MNS city chief killed 
मराठवाडा

धक्कादायक! मनसे शहरप्रमुखाची हत्या

MNS| Parbhani Crime| सचिन पाटील यांच्या मित्रानेच त्यांच्या खुनाचा कट रचल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामा ब्युरो

परभणी : परभणीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसे शहर प्रमुख सचिन पाटील (Sachin Patil) यांची हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने संपूर्ण परभणी जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सचिन यांच्या हत्येनं त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सचिन यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पाटील कुटुंबीयांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन पाटील हे मनसेचे शहर प्रमुख होते. सचिन पाटील यांच्या मित्रानेच त्यांच्या खुनाचा कट रचल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच, या हत्येमागे शुल्लक कारण होतं की आणखी काही वाद होता, याचाही पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी आद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात बसले होते. यावेळी अचानक त्यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला. पण या वादाचं रुपांतर हाणामारी पर्यंत गेलं. त्यात त्यांच्याच एका कार्यकर्त्यांने सचिन पाटील यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. कार्यकर्त्यांनी सचिन पाटील यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप रक्तस्त्राव झाला होता. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याशिवाय पोलीस सचिन पाटील यांच्या कुटुंबीयांकडून, त्यांचे फोन रेकॉर्ड तपासून तसंच इतरांच्या चौकशीच्या माध्यमातून त्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. तसेच या हत्येमागे नेमका कुणाचा हात आहे, याचाही पोलीस तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT