Shivsena Mp Shrirang Barne
Shivsena Mp Shrirang Barne Sarkarnama
मराठवाडा

Shrirang Barne : राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेची कामं होत नाहीत...

लक्ष्मण सोळुंके

जालना : जिथे जिथे राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत तिथे तिथे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशा असंख्य तक्रारी या शिवसंपर्क मोहिमेत आपल्याकडे आल्या आहेत. (Jalna) याचा अहवाल आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत. यावर तेच काय तो निर्णय घेतली, असे स्पष्ट करत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसवर तोफ डागली. (Shivsena) बारणे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

तीन दिवसांच्या जालना दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पालकमंत्र्यांबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे म्हटले. मावळ मतदारसंघावर दावा सांगणारी मागणी कोणी केली याचा शोध घ्यावा लागेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. शिवसंपर्क मोहिमेत खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मराठवाड्यातील जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आपल्या दौऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून आपली कामेच होत नसल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याचे बारणे यांनी सांगितले. बारणे म्हणाले, राष्ट्रवादीकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारींचा अहवाल आपण परत गेल्यावर पक्षप्रमुखांना देणार आहोत. शिवसेनेच्या पदाधिकार्यांची राष्ट्रवादीकडून कामं होत नाहीत, या संदर्भात नाराजी आणि मोठ्या तक्रारी या संपर्क मोहिमे दरम्यान आपल्याकडे आल्या.

महाराष्ट्रात सगळीकडे राष्ट्रवादींच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कामे होत नाही, अशा तक्रारीरी शिवसैनिकांकडून होत आहेत. मराठवाड्यातील बीड आणि जालन्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. या तक्रारींचा अहवाल पक्षप्रमुखांकडे सादर करणार असून जो काय निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे नामांतर कधी होणार? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या संदर्भात निर्णय घेतील असे बारणे यांनी स्पष्ट केले.

नवनीत राणा यांनी शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर टीका केली याकडे बारणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले मी त्यांच्या टीकेला महत्व देत नाही. मावळच्या शिवसेनेच्या जागेवर दावा सांगणाऱ्याचा शोध घ्यावा लागेल, ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली हे शोधलंच पाहिजे, पण या मागणीला देखील मी महत्व देत नाही, असे म्हणत बारणे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. राज्यात भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे.

ईडीच्या धाड सत्राच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नसल्याचे विधान केले. बोलतांना काही प्रमाणात माणूस ओघात बोलून जातो आणि त्याचा विपर्यास केला जातो. हा प्रश्न तर खरा आव्हाड यांनाच विचारायला हवा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट आहे इथे अठरा पगडा जाती राहतात, त्यामुळे कुणाला असुरक्षित वाटण्याचे कारण नाही, असेही बारणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT