Sillod Assembly EleCtion 2024  
मराठवाडा

Sillod Assembly EleCtion 2024 : शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या आमदाराला घरी पाठवा- अंबादास दानवे

सिल्लोड - सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा येथे शिवसेना नेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा झाली.

सरकारनामा ब्यूरो

सिल्लोड : सिल्लोड - सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा येथे शिवसेना नेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा झाली. येथील स्थानिक आमदारांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास विरोध करण्यात आला होता.

शिवस्मारक समितीच्या वतीने पुतळ्याच्या बांधकामास मदत केली असल्याने सत्कार केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांना कारागृहात टाकण्याची अवास्तव धमकी देणाऱ्या अब्दुल सत्तारची काय औकात आहे. महाविकास आघाडीचे शासन आल्यास अब्दुल सत्तार यांची इतकी भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत की, त्यांना नक्कीच कारागृहात टाकावे लागणार आहे.

भ्रष्ट आणि जमीन बळकवणाऱ्या अब्दुल सत्तार यांना त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे शासन आल्यास चौकशी करून कारागृहात टाकू, असा इशारा अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणातून दिला. ही निवडणूक प्रत्येक स्वाभीमानी सिल्लोडकरांची आहे, असेही दानवे म्हणाले. सिल्लोड-सोयगावचे भविष्य कोणाच्या हाती द्यायचे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर पाटील, तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, दत्ता पांढरे,सुनील मिरकर, अंकूश पालोदकर, शांतीलाल अग्रवाल,देविदास आमटे, भास्कर आहेर, नथ्थू मोरे, संतोष निकम, दिगंबर मोरे, एकनाथ सुलताने व रामेश्वर काळे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT