sister mayor brother deputy mayor Sarkarnama
मराठवाडा

Municipal Election : 'भाऊ-बहिणी'चा डंका! नगराध्यक्ष पदी बहीण, तर उपनगराध्यक्ष पदी भावाची बिनविरोध निवड

sister mayor brother deputy mayor unopposed election | बिनविरोध निवडीतून बहीण नगराध्यक्ष आणि भाऊ उपनगराध्यक्ष झाल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Jagdish Pansare

Ausa Municipal Council News : औसा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यादांच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदावर बहीण-भाऊ विराजमान झाले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परवीन शेख या नगराध्यक्ष पदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या उपनगगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अफसर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गेल्या सभागृहात अफस शेख हे नगराध्यक्ष होते. यावेळी मात्र त्यांनी बहीण परवीन शेख यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली होती. आता बहिणीच्या अध्यक्षतेखाली अफसर शेख हे उपनगराध्यक्ष म्हणून काम करतील. नगराध्यक्ष परवीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज अफसर शेख यांचा असल्यामुळे त्यांची निवड पिठासीन अधिकाऱ्यांनी बिनविरोध जाहीर केली.

बैठकीत स्वीकृत नगरसेवक म्हणून अब्दुल हमीद सय्यद आणि जुनेद सय्यद (काका-पुतणे) यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. गेल्या सभागृहात 20 पैकी 12 नगरसेवक आपल्या बाजूने ठेवत आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष बनत अफसर शेख यांनी पालिकेवर वर्चस्व मिळवले होते. यंदाच्या निवडणुकीत 23 पैकी तब्बल 17 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. परवीन शेख या नगराध्यक्ष झाल्याने शेख कुटुंबाची नगरपालिकेवरील पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली.

औसा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच बहीण नगराध्यक्ष आणि भाऊ उपनगराध्यक्ष असा योग आला आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता या दोघांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असणार आहे. औसा शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर तातडीने काम करणे अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा सुरळीत करणे, जलस्रोत व्यवस्थापनाचे नियोजन, शहरभर जमा होणाऱ्या कचऱ्याची नियमित विल्हेवाट, प्रत्येक प्रभागात दररोज घंटागाडीची फेरी, नव्या हद्दवाढ भागातील सुविधांवर नव्या सत्ताधाऱ्यांना जोर द्यावा लागणार आहे.

नाल्या, सांडपाणी व पावसाळी पाण्याचा योग्य निचरा, रस्त्यांच्या कडेने आवश्यक पायाभूत सुविधा, शहराच्या विकास आराखड्याचे आधुनिकीकरण, मोकळ्या जागांचा विकास करून व्यापारी संकुल उभारणी, मोकळ्या मैदानाचा लोकहितासाठी वापर आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही आव्हानेही शेख आणि त्यांच्या टीमला पेलावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT