Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : दंगल प्रकरणी नितेश राणे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करा..

Shivsena : निलेश राणे यांनी पुराव्यासह हे आरोप केलेले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चौकशीत खरे खोटे काय समोर येईलच.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली होती. त्यानंतर आता २००४ मध्ये महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा कट मातोश्रीत उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी आखला होता या भाजप आमदार नितेश राणे यांच्या आरोपांची एसआयटी मार्फत चौकशी करा, अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.

आज सायंकाळीच शिष्टमंडळासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचेही शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे. राज्याच्या विविध भागात सध्या जातीय दंगली घडत आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कर्नाटक राज्यातील पराभवानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा भाजपचा प्लान असल्याचा गंभीर आरोप केला होता.

त्यानंतर आता २००४ मध्ये मातोश्रीवर मुंबई व इतर भागात दंगली घडवण्यासाठी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती, या निलेश राणेंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या संदर्भात संजय शिरसाट म्हणाले, राज्याच्या विविध भागात ज्या दंगली होतायेत, त्या कशासाठी आणि कोण करतयं याचा थांगपत्ताच लागत नाहीये. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी २००४ मध्ये मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दंगली घडवा, त्याचा सत्ता येण्यासाठी फायदा होतो असे सांगत कट रचला होता, असा आरोप केला होता.

याच आरोपाच्या आधारे २००४ मध्ये झालेल्या त्या बैठकीची आणि सध्या राज्यात होत असलेल्या जातीय दंगलींची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. निलेश राणे यांनी पुराव्यासह हे आरोप केलेले आहेत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चौकशीत खरे खोटे काय ते समोर येईलच.

पण सत्ता गेली म्हणून ती मिळवण्यासाठी पुन्हा दंगली घडवायच्या आणि खापर सरकारच्या माथी फोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा असा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नाही. नितेश राणे यांनी केलेले आरोप, त्यात उल्लेख केलेल्या नेत्यांचे नाव मला देखील माहित आहे. पण एकदा त्याची एसआयटी चौकशी होवू द्या, राज्यात दंगली घडवणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर येवू द्या, यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत, असेही शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT