Mla Sambhaji Patil Nilangekar , News
Mla Sambhaji Patil Nilangekar , News Sarkarnama
मराठवाडा

Mla Sambhaji Patil Nilangekar : लातूर जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतीत होणार कौशल्य विकास केंद्र

सरकारनामा ब्युरो

Latur News : ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षित करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध व्हाव्यात याकरीता भाजप-शिवसेना सरकारने ग्रामस्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. (Mla Sambhaji Patil Nilangekar ) या निर्णयामुळे ग्रामीण भागातील युवक आत्मनिर्भर होऊन गाव तेथे उद्योग या संकल्पनेस बळ मिळणार आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र मंजूर झाल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

शहराकडे रोजगारासाठी होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे व स्थानिक पातळीवरच रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावेत याकरीता राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती. (Latur) त्यानुसार १८ ते ४५ वयोगटातील युवक व युवतींसाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम, मिडिया, आयटी, ऑटोमोबाईल्स आदी क्षेत्रासाठी ३०० ते ५०० तासाचे प्रशिक्षण या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. (Sambhaji Patil Nilangekar) या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. (Marathwada) त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातही ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरु व्हावे अशी मागणी केली होती. या मागणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये असलेल्या पंधरा ग्रामपंचायतीसाठी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे.

यामध्ये निलंगा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, कासारशिरसी, देवणी तालुक्यातील वलांडी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, औसा तालुक्यातील किल्लारी व उजनी, अहमदपूर तालुक्यातील किनगाव व शिरुर ताजबंद, चाकूर तालुक्यातील नळेगाव व चापोली, जळकोट तालुक्यातील गुत्ती, लातूर तालुक्यातील मुरुड, रेणापूर तालुक्यातील पानगाव तर उदगीर तालुक्यातील हंडरगुळी व वाढवणा येथील ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरु केले जाणार आहे.

लवकरच या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ होऊन त्याचा लाभ युवक व युवतींना होईल. या माध्यमातून प्रधानमंत्री मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत युवक व युवतींना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य करण्यात येणार आहे. सदर कौशल्य विकास केंद्र मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT