Sharad Pawar - Ramdas Athawale - Narendra Modi Sarkarnama
मराठवाडा

Ramdas Athawale News: ''...म्हणून शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं!''; आठवलेंचं मोठं विधान

Ramdas Athawale on Sharad Pawar : शरद पवार हे अनुभवी आणि मोठे नेते...

सरकारनामा ब्यूरो

Beed Political News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेहमीच राज्य आणि देशपातळीवरील राजकारणावर भाष्य करत असतात. महाविकास आघाडीसह उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजप - एनडीपीपी यांच्या युतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलेली असतानाच आता मंत्री आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.

रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले,शरद पवार हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांनी नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं अशी माझी इच्छा आठवले यांनी बोलून दाखविली आहे. यावेळी त्यांनी नागालँडमध्ये पवारसाहेबांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडून मोदी साहेबांसोबत काम करावं असं वक्तव्य केलं आहे.

नागालँड येथील निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या असून, जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे. तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करुन दाखवणार आहे. मात्र,या निवडणुकीत आपण भाजप आणि शिंदे यांच्यासोबत राहून आपल्या पक्षाचं खातं उघडणार असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

आठवलेंची आंबेडकरांना पुन्हा एकदा ऑफर...

प्रकाश आंबेडकर यांची युती ही फक्त शिवसेनेची झाली आहे. ते अजूनही महाविकास आघाडीत गेलेले नाही. त्यामुळे मी दोन पावलं मागे यायला तयार असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कितीही नेते उभे राहिले तरी त्यांचा पराभव करणे कोणालाही शक्य होणार नाही. त्यामुळे सर्व दलित नेत्यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल व्हावं आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच पक्षाची आवश्यकता असते गरजेचं आहे असं देखील आठवले म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या हिताचा अर्थसंकल्प...

सामाजिक आर्थिक आणि औद्योगिक यासह सर्व बाबींचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या हिताचा असल्याचं आठवले म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT