Ashok Chavan-Shrijaya Chavan Sarkarnama
मराठवाडा

Shrijaya Chavan : मी शंकरराव चव्हाणांची नात, मला साथ द्या..

Bhokar Assembly Constituency : लोकसभेतील पराभवाने सावध होत अशोक चव्हाण यांनी विधानसभेसाठी रणनिती आखली आहे. मराठा आरक्षण, चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये सत्ता, मुख्यमंत्री, मंत्री, नेते पद भुषवल्यानंतर भाजपमधील त्यांच्या प्रवेशाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता.

Jagdish Pansare

Nanded BJP News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची नात, माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया राजकारणातील एन्ट्रीसाठी सज्ज झाली आहे. वडील, आई अमिता चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोकर मतदारसंघातून श्रीजया राजकारणात येऊ पाहत आहेत.

दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जंयती निमित्त भोकर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्रीजया चव्हाण कामाला लागल्याचे चित्र आहे. `मी शंकरराव चव्हाण यांची नात आहे, मला साथ द्या`, अशी साद त्या घालताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Nanded) नांदेडमध्ये महायुतीला पराभव पचवावा लागला होता.

अशोक चव्हाण यांचा भाजपमधील प्रवेश महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण लोकसभेवर निवडून गेले. लोकसभेतील पराभवाने काहीसे सावध होत अशोक चव्हाण यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे. मराठा आरक्षण आणि चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये सर्व सत्ता, मुख्यमंत्री, मंत्री, नेते पद भुषवल्यानंतर भाजपमध्ये चव्हाण यांनी केलेला प्रवेश याबद्दल निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता.

तो लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममधून बाहेर पडला. विधानसभा निवडणुकीत हाच ट्रेंड कायम राहू नये, श्रीजया चव्हाण यांच्या राजकीय प्रवेशाला ब्रेक लागू नये, यासाठी अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाची सुत्रे हाती घेतली आहेत. श्रीजया चव्हाण यांना जनतेशी संपर्क वाढवायला लावून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भोकरमध्ये विजयाची समीकरणे जुळवून आणण्यासाठी झटताना दिसत आहेत.

भोकर हा चव्हाण कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. इथून विजय अशोक चव्हाण किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणालाही अवघड नाही, असा दावा केला जात होता. पण लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला झटका पाहता अशोक चव्हाण कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाहीत.

भोकर मतदारसंघात फिरताना `आमच्यावर नानांचे संस्कार आहेत, त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती, मी पण कायद्याची पदवी घेतली आहे. नानांकडूनच मी समाजसेवेचा वसा घेतला आहे. मी शंकरराव चव्हाण यांची नात असुन खासदार अशोक चव्हाण व माजी आमदार अमिता चव्हाण यांची मुलगी आहे, तुम्ही मला साथ द्या` अशी भावनिक साद श्रीजया चव्हाण जनतेला घालत आहेत. आता भोकरचे मतदार घराणेशाहीची परंपरा पुढे चालवतात? की मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी देतात? हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT