Ncp Leader Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

मरगळ झटकून नव्याने सुरूवात करा ; पुन्हा यश मिळवा..

(Ncp President) राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे पराभव झाला, (Jayant Patil) या पराभवाचे रुपांतर आपल्याला विजयात करायचे आहे

सरकारनामा ब्यूरो

परभणी ः गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे घवघवीत यश मिळवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दाखल झाली. यावेळी गंगाखेड - पालम - पूर्णा विधानसभा मतदारसंघाचा आढावा पाटील यांनी घेतला.

पक्षातील लोकांशी हितगुज साधण्यासाठी परिवार संवाद यात्रा आहे. पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने, विचारमंथन करण्यासाठी या भागात यात्रा काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे पराभव झाला, या पराभवाचे रुपांतर आपल्याला विजयात करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकांनी मतदारसंघात एक चांगले वातावरण निर्माण करावे, मरगळ झटकून पुन्हा नव्याने सुरुवात करावी. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले, तर आपण पुन्हा या मतदारसंघात विजय मिळवू, अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या पक्षाचं मूळ पक्कं करणं, राष्ट्रवादी हे आपलं घर पक्कं करणं हा परिवार संवाद यात्रेचा उद्देश असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. २०२४ मध्ये पक्षाकडे असलेल्या जागा आपल्याला राखायच्या आहेतच शिवाय पराभव झालेल्या जागा पुन्हा जिंकून भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे, असे आवाहनही केले.

लोकशाही म्हणजे काय असते याचं जिवंत उदाहरण आदरणीय शरद पवार साहेबांनी २०१९ मध्ये जगासमोर आणि राज्यात सत्ता स्थापन करुन दाखवून दिले आहे. सत्तेत असताना आणि विरोधात असताना पक्ष पाहिला, आता सत्ता असताना प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला जाऊन भेटण्याचे एकमेव उदाहरण जयंत पाटील यांच्या रुपाने पाहायला मिळत असल्याचे गौरवोद्दगारही मुंडे यांनी काढले.

परभणीत आपली लढाई परंपरागत राष्ट्रीय समाज पक्षासोबत आहे. भले ही लढाई कुणासोबतही होवो परंतु विजय आपलाच होणार या ताकदीने आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत घड्याळाचा गजर झालाच पाहिजे ही खूणगाठ बांधा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT