Industry Minister Subhash Desai Sarkarnama
मराठवाडा

Subhash Desai : महाराष्ट्राचा औद्याोगिक विकास कधी थांबला नाही, थांबणारही नाही

गुंतवणूकदारासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नाही. पर्यटनात व उद्योगात आघाडीवर असलेले शहर म्हणून औरंगाबादने स्वत:ची ओळख बनवली आहे. (Subhash Desai)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय उद्योगांना गुंतवणूकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणे हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. याअनुषंगाने ऑरीक सिटीमध्ये उद्योगांना गंतुवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. (Aurangabad) कोरोना कालावधीत देखील राज्यातील उद्योग सुरु राहीले. (Maharashtra) यातून महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबला नाही आणि थांबणार नाही, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ऑरीक सिटी हॉल येथे आयोजित औरा ऑफ ऑरीक, एफडीआय ॲण्ड टूरीझम कॉनक्लेव कार्यक्रमात व्यक्त केला.

औरंगाबाद शहरात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी आठ देशातील राजदुतांसमवेत ऑरिक सिटीत कॉनक्लेवचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीसाठी संवाद व सहकार्य तसेच पायाभूत सुविधांच्या उपलब्धेतसह ‘मेक इन इंडिया,’‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’या उपक्रमातून आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीस सहकार्य आणि आवाहन करण्यात येत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

गुंतवणूकदारासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नाही. पर्यटनात व उद्योगात आघाडीवर असलेले शहर म्हणून औरंगाबादने स्वत:ची ओळख बनवली असून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लवकरच आंतराष्ट्रीय उच्चायुक्त सोबत मंत्रालय स्तरावर बैठक नियोजित आहे. रोजगार आणि राज्याच्या निर्यातक्षम बाजारपेठ मिळण्यसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

ऑरिक सिटीत विविध सुविधा उपलब्ध असुन दिल्ली-मुंबई कॅरिडॉर त्याचप्रमाणे हवाई वाहतुक, रस्ते वाहतुक, पायाभूत सोयी सुविधा अल्पदरामध्ये वीज पुरवठा अशा विविध सुविधाने औरंगाबाद इंडस्ट्रिलयल टाऊन शिपसाठी ऑरिक या नावाने विदेशी गुंतवणूकीसाठी विपणन केले जात आहे.

यामध्ये विविध देशातील राजदूतांसमवेत राज्यात तसेच औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी असलेल्या सुविधा शासनाचे धोरण आणि परदेशी गुंतवणधारांना सहकार्य करण्यासाठी ऑरिक सिटीत कशाप्रकारे प्रयत्न करत आहे, याची माहिती उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन, अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, सिंगापूरचे उच्चायुक्त चुआँग मिंग फुंग, उप उच्चायुक्त, झाच्चायुस लिम, जर्मनीचे मारजा-सिरक्का ईनिग, दक्षिण कोरीयाचे यंग ओग किम, इस्त्रायलचे कोब्बी शोशोनी, सुरक्षा अधिकारी योव्हेल बारुची, राहमीम होशबाती, नॅदरलॅण्डचे उच्चायुक्त अलबर्टस विलहोमस दे जोंग, रशियाचे उच्चायुक्त अलेस्की सुरोत्वेत्सव, तैवान चेबंर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर माखेचा, स्वीस बिझनेसचे व्यापार आयुक्त विजय अय्यर यांच्यासह इतर देशाचे उच्चपदधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT