उस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून विमा नाकारण्यात आला होता. या विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्याने या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. (Ranajagjeetsingh Patil) याबद्दल शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अभिनंदन केले आहे. (Osmanabad Latest News)
फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब भाजयुमो अध्यक्ष प्रशांत लोमटे आणि इतरांनी जिल्ह्यातील ३,५०,२८७ शेतकर्यांवर पीकविम्यासंदर्भात झालेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या सर्व शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही. राज्यात सरकार असताना शेतकर्यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे? शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते, इतर सर्व याचिकाकर्ते अशा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
तसेच शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल उच्च न्यायालयाचे सुद्धा खूप खूप आभार फडणवीस यांनी मानले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाबद्दल समाधान व्यक्त करत आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा केला आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेने देखील शेतकऱ्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय घेणारे बॅनर ठिकठिकाणी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी विरुद्ध भाजप यांच्यात श्रेय घेण्यावरुन राजकारण सुरू झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.