sunil shelake rohit pawar sarkarnama
मराठवाडा

Sunil Shelke News : सुनील शेळकेंचा रोहित पवारांबद्दल गौप्यस्फोट; म्हणाले, 'शिष्टमंडळ घेऊन जाणारा म्होरक्या कोण?'

Political News : भारतीय जनता पक्षासोबत जायचे असा आग्रह धरून शरद पवार यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणारा म्होरक्या कोण होता ? असा सवाल करीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर टीका केली.

Sachin Waghmare

Beed News : लोकसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसापासून रणधुमाळी सुरू असून सध्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत रान पेटवले जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर केल्या जात असलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके (Sunil shelke )यांनी केला आहे. 22 जून 2022 रोजी वाय. बी. सेंटरला शरद पवार यांच्याकडे कोण घेऊन चालले होते. आमच्या सर्व आमदारांचा मोहरक्या कोण होता ? की जे सांगत होते की भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे. आपण सत्तेत जायला पाहिजे, तेच रोहित पवार आज निष्ठेची भाषा बोलत असल्याची टीका आमदार शेळके यांनी केली. (Sunil Shelke News)

बीड येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट करीत टीका करीत खडे बोल सुनावले आहेत.

आपण पहिल्या टर्मचे आमदार आहात त्यामुळे थोरामोठ्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या भावना जरूर मांडल्या पाहिजेत, परंतु आपण देखील किती पाण्यात आहात हे जनतेला माहित आहे. अधिक खोलात न जाता योग्य वेळी आपले तोंड बंद करावे, अन्यथा आम्ही या आठवड्यात तोंड उघडणार आहोत, असा इशारा सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोप करणे टाळण्याचा सल्ला

बारामतीमध्ये विकास कोणी केला आहे, हे जनतेला माहित आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या दोन लाख मताने विजय होतील, असा विश्वासही सुनील शेळके यांनी व्यक्त केला. त्यासोबतच येत्या काळात इतरांवर आरोप करणे टाळले पाहिजे असा सल्लाही यावेळी सुनील शेळके यांनी दिला.

SCROLL FOR NEXT