Beed News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे. राज्यात येत्या काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी केली जात आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या या उपोषणाच्या समर्थनार्थ शनिवारी बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यापूर्वीही जरांगे पाटील यांचे विविध आंदेालने, शांतता रॅली, अंतिम इशारा सभांना जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. (Manoj Jarange News)
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) एक वर्षांपासून घरदार सोडून लढा देत आहेत. सुरूवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता.
मुंबईवरील मोर्चावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सगेसोयरेचे अधिसुचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता. यानंतरही उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जात आहे, परंतु शब्द पाळला जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
आता सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली आहे. वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी तात्कळ करावा, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करा, अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या कुटूंबातील सदस्यांना शासकिय नोकरी देण्यात यावी, मागेल त्या गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा आणि कुणबी एकच आहे हा अद्यादेश पारीत करण्यात यावा, अशा मागण्या आहेत.
या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून आता उपोषणाच्या पाचव्या दिवशी अखंड मराठा समाजाच्या वतीने शनिवारी बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. बीडसह जिल्हाभरात सर्व व्यापारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदने देण्यात आली आहेत. जिल्ह्यात शनिवारी दुपारपर्यंत शांततेत बंद होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.