Mp Supriya Sule
Mp Supriya Sule Sarkarnama
मराठवाडा

Supriya Sule : सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपुर्वी हल्ला केला होता. (Ncp) या हल्ल्या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ` सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला` होता असं त्या म्हणाल्या. (Marathwada)

८ एप्रिल रोजी अचानक आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे धाव घेत हल्ला केला होता. महिला कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात बांगड्या फोडून घेतल्या होत्या, तर काही कर्मचाऱ्यांनी चपला आणि दगंडाचा मारा घरावर केला होता. या हल्लाने राज्यात एकच खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे तेव्हा पवार कुटुंबिय घरातच होते. बाहेर गदारोळ सुरू असतांना सुप्रिया सुळे या आंदोलकांना सामोरे गेल्या होत्या, त्यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवत त्यांनी हे प्रकरण अतिशय संयमाने हाताळले होते. परंतु या हल्ल्याची दाहकता विषद करतांना सुळे यांनी हा हल्ला माझ्या आईवर होता, असे म्हटले आहे.

सुळे औरंगाबाद दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, सिल्व्हर ओकवर झालेला हल्ला, राज ठाकरे यांनी उपस्थितीत केलेला भोंग्याचा व इतर विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सिल्व्हर ओकवर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता. आणि माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला होता. हे राज्य हा देश माझी आई आहे, अशी माझी भावना आहे. त्यामुळे आई जशी आपल्या मुलांची, कुटुंबाची काळजी घेते, तसंच मला त्या दिवशी सिल्व्हर ओकवर आलेल्या महिलांचे दुःख समजवून घ्यायचे आहे.

मी पोलिसांना देखील तशी विनंती केली आहे. राज्याच्या सत्तेत महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्याच्या घरावर जे लोक चालून आले होते, ते नक्की कोण होते, त्यांना एवढे दुःख का झाले? त्यांच्या नेमक्या वेदना काय होत्या? हे मला नक्कीच जाणून घ्यायचे आहे. त्या महिला सातत्याने १२० एसटी कर्मचारी दगावल्याचे सांगत होत्या, पण त्याची माहिती त्यांच्याकडे नव्हती.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर, संपावर पवार साहेब, दादा, अनिल परब आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या, त्यावर तोडगा काढला. ९ हजार कर्मचारी गुलाल उधळत कामावर रूजू झाले. मग अचानक हल्ला कसा होतो? हे चुकीचे आहे. परंतु तरी देखील मला त्या महिलांशी, बोलायचे आहे, त्यांचे दुःख समजून घ्यायचे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT