सिल्लोड : सिल्लोड ची बाजारपेठ एकेकाळी जिल्ह्यात अग्रेसर होती. परंतु मागील काही वर्षात हुकूमशाही आणि जुलूमशाहीच्या धोरणामुळे बाजारपेठेला उतरती कळा लागली, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी प्रचार सभेत बोलतांना केली.
हे चित्र तालुक्यासाठी दुर्दैवी असून ते बदलण्यासाठी, परिवर्तनासाठी माझ्यासोबत या, असे आवाहनही बनकर यांनी केले. व्यापारी वर्ग आपली दुकाने कायमस्वरूपी बंद करून शेजारच्या तालुक्यामध्ये स्थलांतर करत आहे. ही बाब आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, असे ते म्हणाले.
पायाभूत सुविधांचा अभाव आणि वरून जुलूम जबरदस्ती आणि होणारा छळ यामुळे व्यापारी बांधव त्रस्त आहे. उद्योग, व्यापार आणि व्यवसायाला पोषक असे वातावरण आता राहिलेलं नाही. अद्ययावत व्यापारी संकुल, वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था, प्रशस्त रस्ते, आपत्कालीन सुरक्षेच्या उपाययोजना, सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने सगळ्यांचीच गैरसोय होत आहे. हे चित्र आपल्या तालुक्यासाठी दुर्दैवी आहे. गड्यांनो, हे चित्र आपल्याला बदलायच आहे. चला, माझ्यासोबत परिवर्तनाच्या लढ्यात सामील व्हा, असे आवाहन सुरेश बनकर यांनी केले.
येणाऱ्या २० तारखेला महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाला साथ द्या. या सिल्लोडमधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आमदार विधानसभेत पाठवा, असेही बनकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.