Omraje Nimbalkar Vs Suresh Birajdar Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : 'ओमराजेंना सांगा पहिलवान तयार', म्हणत राष्ट्रवादीच्या बिराजदारांनी थोपटले दंड!

Mayur Ratnaparkhe

Dharashiv Loksabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आता आपले मतदारसंघ आणि उमेदवार निश्चित करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमधील नेते मतदारसंघावरून दावे-प्रतिदावे करत आहेत.

दरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे निश्चित मानली जात असून, या जागेवर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर उमेदवार मानले जात आहेत. तर महायुतीकडून मात्र या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदारांनी दंड थोपटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'ओमराजेंना सांगा पहिलवान तयार आहे.', असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) लोकसभेचे इच्छुक उमेदवार आणि प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीसाठी आव्हान दिलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांना तुमचा पहिलवान तरी आखाड्यात उतरवा, असं आव्हान दिलं होतं. यावर बिराजदार यांनी महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना दिल्याचे बिराजदार यांनी सांगितले आहे. त्यामुळे धाराशिवची जागा ही महायुतीकडून अजित पवार गटाला सुटणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवच्या निवडणुकीमध्ये ओमप्रकाशराजे निंबाळकर एक लाख 27 हजार मतांनी निवडून आले होते. धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा 11 तालुक्यांचा आणि सहा विधानसभा मतदारसंघाचा बनलेला आहे. या मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 1100 ते 1200 गावांचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT