Suresh Dhas
Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : देवस्थानच्या जमिनी हडपल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल!

सरकारनामा ब्यूरो

बीड : भाजपचे विधानपरिषदेतील आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थानच्या जमीनी बेकायदेशीरपणे हडपल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवला गेला आहे. सुरेश धस यांच्यासह पाच जणांवर बीडमधील आष्टी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवला गेला आहे. सुरेश धस यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना सुरेश धस यांच्यावर देवस्थानच्या जमीनी बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप झाले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही आरोप केले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील धस यांच्यावर आरोप केले होते. याबाबत त्यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. मात्र आरोपकर्त्यांचा दावा होता की, तक्रार करूनही कारवाई होत नाही. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आता लाचलुचपत प्रतिबंध विभाग तक्ररीमुळे आता पोलिसात गुन्हा नोंदवला गेला आहे.

सुरेश धस यांच्यासोबतच त्यांची पत्नी व बंधू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता धस यांना अटक होण्याची शक्यता आहे. सुरेश धस यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याने जामीनासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे समजत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT