Ravikant Tupkar Sarkarnama
मराठवाडा

Ravikant Tupkar : तुपकरांनी अंगावर पेट्रोल ओतलं..;पोलिसांच्या वेशात येऊन आत्मदहन..

सरकारनामा ब्युरो

Ravikant Tupkar news update : शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते चार दिवसापासून गायब होते.

तुपकर आज (शनिवारी) दुपारी अचानकपणे बुलढाणा येथे पोलिसांच्या वेशात आले, त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतलं आहे.

गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर किंवा मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा अकरा फेब्रुवारीला तुपकर यांनी दिला होता.

पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह आत्मदहनाचा इशारा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT