Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar  Sarkarnama
मराठवाडा

भाजपकडून महाविकास आघाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; निर्णय घेतला नाही तर दहावाही घालणार

राम काळगे

निलंगा : महाविकास आघाडी सरकारच्या महावितरण विभागाने शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्यासाठी व ट्राँसफार्मर जळाल्यानंतर पैसे भरा, तरच ट्राँसफार्मर मिळेल असा शेतकरी विरोधी फतवा काढल्याच्या निषेधार्थ भाजपने महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध केला.

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत आज तीन तास आंदोलन केले. शिवाजी चौकातुन महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, स्वतः संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश कराड यानी या अंत्ययात्रेला शेवटपर्यंत खांदा दिला.

निलंगा मतदार संघातील अनेक गावातील शेतकरी उलटी हलगी वाजवत या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. शहरातील शिवाजी चौकातून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी तहसिल कार्यालयासमोर गेले. तिथे पोलिसांनी प्रतिकात्मक प्रेत व तिरडी ताब्यात घेतली.

यावेळी अयोजित प्रतिकात्मक शोकसभेत बोलताना निलंगेकर म्हणाले, अतिवृष्टी व पूरपरिस्थिती यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असताना शासनाने मदत करणे अपेक्षित होते. मात्र मदत तर दूरच राहीली उलट शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा तोडण्याचा अन्यायकारक प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहे.

बहुतांशी शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या रब्बी पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ असताना बिलासाठी वीज पुरवठा खंडित करणारा काळा जीआर काढून शेतकऱ्यांना संकटात टाकणारा दुर्दैवी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. वीज विभागाने काढलेला काळा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा.

३ एचपी साठी १६ हजार रुपये आणि पाच एचपी साठी २५ हजार रुपये भरण्याची सक्ती थांबवावी, शेतकऱ्यांची तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करावे या मागणीसाठी तसेच शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारला भानावर आणण्यासाठी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून जाहीर निषेध करत असल्याचे निलंगकेर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना द्यायचे आणि ट्राँसफार्मरच्या माध्यमातून वसूल करायचे असे हे वसूली सरकार असून अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर असताना महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोपही निलंगेकर यानी केला.

आमदार रमेश कराडे म्हणाले, लातूरचे पालकमंञी दाखवा आणि दोन हजार मिळवा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वा-यावर सोडून सत्तेची मस्ती डोक्यात शिरलेले सर्वच मंञी शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाच फोडू शकत नाहीत तसेच जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपा उमेदवाराचे अर्ज वैध ठरल्यामुळे ते लातूरला येत नाहीत, अशी टीकाही कराड यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT