Fauziya Khan News, Aurangabad
Fauziya Khan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Fauziya Khan : महागाई, बेरोजगारीवर बोललं, की ईडी, सीबीआयची धमकी देवून तोंड बंद केली जातात..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : मागील तीन टर्म पासून विक्रम काळे विधीमंडळात मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने ते सभागृहात मांडत असतात. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणार्‍या विक्रम काळे (Vikram Kale) यांना पुन्हा विधीमंडळात काम करण्याची संधी द्या, असे आवाहन खासदार फौजिया खान यांनी केले.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारी रोजी होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. (Ncp) त्यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी, विविध शिक्षक संघटनांच्यावतीने देवगिरी महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना (Aurangabad) फौजिया खान म्हणाल्या, मी राज्याची शालेय शिक्षण राज्यमंत्री असताना विक्रम काळे यांची शिक्षकांविषयी असलेली तळमळ जवळून पाहिली आहे.

शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजे ,असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा यात अनेकदा त्यांना यश आले. आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले असून लोकशाही धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी वाढत असताना त्यावर कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर ईडी, सीबीआयची धमकी दाखवून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. तर शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. समाजाला परिवर्तीत करण्याचे काम शिक्षक करतो.

या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे काम विक्रम काळे व सतीश चव्हाण सातत्याने करत आले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांवर भाजप दुटप्पी भूमिका घेत असून इच्छा शक्ती असेल तर शिक्षकांचे सर्व प्रश्न निकाली काढा, असे राजेश टोपे म्हणाले. २३ जून २०२२ रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासकडे आम्ही शाळा अनुदान, जुनी पेन्शन, शिक्षक-प्राध्यापक भरती यासारख्या महत्वाच्या प्रश्नांसाठी बैठक घेतली.

त्यामध्ये शाळा अनुदान व जुन्या पेन्शनचा प्रस्ताव सम्यक समितीच्या अहवालासह मंत्रीमंडळासमोर आणा, सरकार निर्णय घेईल, असे निर्देश अजित पवार यांनी दिले होते. परंतु काही दिवसांमध्ये आपणास अनपेक्षीत सत्ता बदलाला सामोरे जावे लागले. जुनी पेन्शन योजनेसंदर्भात भाजपकडून शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण केला जाता आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही सातत्याने शासनस्तरावर पाठपूरावा करीत आहोत. यापुढेही देखील आमचा यासाठी पाठपूरावा सुरूच राहणार असल्याचे आश्वासन सतीश चव्हाण यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT