Krishna Tawle Youth Congress Sarkarnama
मराठवाडा

उस्मानाबादच्या कृष्णा तवलेंची बाजी; तीनशे तरूणांमधून युवक काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड

सामान्य कुटुंबातील युवकाने काँग्रेसच्या (युवक) राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविल्याने सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.(youth Congress)

सयाजी शेळके

उस्मानाबादः युवक काँग्रेसच्या (youth Congress India) राष्ट्रीय प्रवक्तेपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा तवले यांची निवड झाली आहे. देशभरातून निवडलेल्या ३०० युवकांपैकी कृष्णा यांनी तिसरा क्रमांक मिळवत पहिल्यांदाच महाराष्ट्राला (Maharashtra) हा बहुमान मिळवून दिला. त्यांच्या या निवडीने राज्यातील काँग्रेस (Congress) पक्षाकडून कृष्णा यांचे कौतुक होत आहे.

युवक हा राजकारणातील दिशादर्षक असतो, असे म्हटले जाते, वक्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या "यंग इंडिया के बोल" ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक राज्यातून पाच याप्रमाणे देशभरातून ३०० स्पर्धक निवडण्यात आले होते.

दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेत पंच म्हणून म्हणून माजी केंद्रीयमंत्री अजय माकण, इम्रान प्रतापगडी, दिल्ली महिला प्रदेशाध्यक्ष अल्का लांबा, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, राघीनी नायक, जैवीर शेरगील, प्रणव झा यांनी भूमिका बजावली. देशातील ३०० स्पर्धकातून तिघांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.

यामध्ये दिल्ली येथील अवनी बन्सल यांनी प्रथम, तेलंगणाचे विगेंद्र वर्मा यानी दुसरा क्रमांक मिळाला असून कृष्णा यांनी तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविले आहे. कृष्णा तवले यांचे मूळगाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील शेलगाव (जा) आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आहेत.

कृष्णा यांचे सध्या शिक्षण सुरू असून सामान्य कुटुंबातील युवकाने काँग्रेसच्या (युवक) राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविल्याने सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येणार आहे. याशिवाय आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्येही त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे.

तसेच स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांना संधी दिली जाऊ शकते. कृष्णा यांची निवड उस्मानाबाद जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यासाठी महत्वाची मानली जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय युवक कॅांग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT