Marathwada Teachers Constituency Election, News
Marathwada Teachers Constituency Election, News  sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency : भाजपची उमेदवारी किरण पाटलांना, पण प्रतिष्ठा पणाला लागली बावनकुळेंची..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा प्रचार सध्या जोमात आला आहे. भाजपचे नवखे उमेदवार किरण पाटील विरुद्ध राष्ट्रवादी आघाडीचे विक्रम काळे(Vikram Kale) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांच्या पक्षातून अनुक्रमे नितीन कुलकर्णी व प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

किरण पाटील हे निवडणुकीच्या अवघ्या तीन महिने आधी (Bjp) भाजपमध्ये दाखल झाले. लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात त्यांच्या अनेक संस्था असल्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. परंतु (Marathwada) मराठवाडा शिक्षक मतदारसंघात शिक्षकांची ज्याची नोंदणी जास्त, तोच शिक्षक आमदार असे समीकरण गेल्या काही निवडणुकांपासून बनले आहे.

एका दिवसांत दहा-दहा मेळावे घेत बानवकुळेंनी किरण पाटलांसाठी जोर लावला आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रतीम मुंडे यांना देखील त्यांनी प्रचारात उतरवले आहे. गेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत प्रा. सतीश पत्की यांना १२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. तर तेव्हाचे विजयी उमेदवार राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांना त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे २४ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

मतांमधील हे अंतर मोठे असल्याने ते कमी करून विजय मिळवण्यासाठी भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. किरण पाटील यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर करण्यात आली होती. जणेकरून भाजपला मतदार नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळावा. त्यामुळे आमची नोंदणी झाल्याचा दावा देखील भाजपकडून केला जातोय.

विक्रम काळे यांची ही चौथी टर्म असल्यामुळे मतदार नोंदणीत त्यांचा हातखंडा आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पाटील यांना मतदारांची नोंदणी करायला पुरेसा वेळच मिळाला नसल्याचे बोलले जाते. परंतु किरण पाटील यांना निवडून आणण्यासाठी स्वतः प्रेदशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुत्र हातात घेतली आहेत. उमेदवार किरण पाटील असले तरी या निमित्ताने प्रतिष्ठा मात्र बानवकुळे यांची पणाला लागल्याचे चित्र आहे.

आता येत्या ३० जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, त्यानंतरच हा दावा किती खरा किती खोटा हे स्पष्ट होईल. एकंदरित किरण पाटील यांना निवडून आणण्यासाठी बावनकुळे यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरी, काळे यांच्याविरोधात असलेली नाराजी याचा फायदा भाजपला उठवता येतो का? की, काळे सगळ्या अडचणींवर मात करत चौथ्यांदा शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत जातात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT