Marathwada Teacher Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency Result : विक्रम काळे पहिल्या पंसतीत आघाडीवर, दुसऱ्या क्रमांकावर किरण पाटील...

Marathwada Constituency Election Result: विश्वासराव यांनी देखील चमकदार कामगिरी करत पहिल्या पसंतीची तब्बल ११ हजार मते मिळवत चुरस निर्माण केली.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News: मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पहिल्या पंसतीच्या मतांमध्ये विक्रम काळे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची १९ हजार ७६८ मते मिळाली आहेत. तर किरण पाटील (Kiran Patil) यांना १३ हजार २४७ मते मिळाली. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी देखील १३ हजार २२६ मते मिळवत प्रमुख उमेदवारांना धक्का दिल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या (Marathwada Teacher Constituency) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अपेक्षे प्रमाणे महाविकास आघाडीचे विक्रम काळे भाजपच्या किरण पाटील यांच्यापेक्षा ६ हजार २५१ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Aurangabad) तर मराठावाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी देखील चमकदार कामगिरी करत पहिल्या पसंतीची तब्बल ११ हजार मते मिळवत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे महाविका आघाडीचे विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील असे चित्र मतदानापुर्वी आणि नंतर देखील रंगवले जात होते.

मात्र त्यात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. सुर्यकांत विश्वासराव यांना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले हे पहिल्या पसंतीत त्यांना मिळालेल्या ११ हजार मतांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संशयास्पद मतपत्रिकेवरून वाद मतमोजणी केंद्रावर निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद आणि बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. सकाळी साडेअकरा वाजता एका मतपत्रिकेवर संशयास्पद खुण पाहून भाजप उमेदवार किरण पाटील यांचे प्रतिनिधी शिवाजी दांडगे आणि मतमोजणी अधिकाऱ्यांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली.

त्यामुळे मतमोजणी स्थळी तणाव निर्माण झाला होतो. अखेर निवडणुक निर्माण अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मध्यस्थीने वाद निवळला. मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी मतपेट्या उघडून मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतांचे २५-२५ चे गठ्ठे करुन मोजणीसाठी ५६ टेबलवर प्रत्येकी ४० गठ्ठे देण्यात आले. दुपारी १२ वाजेपासून वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी एका टेबलवर एका मतपत्रिकेवर संशयास्पद खुण आढळून आल्याने भाजप उमेदवार पाटील यांचे प्रतिनिधी शिवाजी दांडगे यांनी आक्षेप घेतला. त्यावरुन मतमोजणी अधिकारी व दांडगे यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. या मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीचे मत विक्रम काळेंना तर दुसर्‍या पसंतीचे मत किरण पाटील यांना नोंदवलेले होते. शिवाय त्यात संशयास्पद खुण आढळली होती. त्यामुळे हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर केंद्रेकर यांनी शांततेत काम करा अन्यथा बाहेर काढले जाईल, असा इशारा दिल्यानंतर वाद निवळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT