Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav On Onion : तेलंगणाला कांदा विकतोय म्हणून इज्जत जातेय ? मग द्या भाव अन् अनुदान..

BRS : आणखी एक संधी देतोय, बघा जमतंय का? नाहीतर आम्ही पुन्हा तेंलगणात कांदा नेवून विकू.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे बेजार आहे. कांदा सडतोय म्हणून त्याला तो रस्त्यावर फेकून द्यावा लागला.(Harshvardhan Jadhav On Onion) महाराष्ट्र सरकारकडे आम्ही कांदा खरेदी करण्याची मागणी केली तर त्यांनी सपशेल नकार दिला. आता आम्ही इथला कांदा तेंलगणात नेवून विकला, शेतकऱ्यांना चांगला भाव दिला, तर अनेकांच्या पोटात दुखतयं. सरकारची इज्जत गेली असं बोललं जातयं.

मग अकराशे रुपयांनी तुम्ही कांदा खरेदी करा, साडेतीनशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात टाका, नाही पाठवणार कांदा तेंलगणाला, अशा शब्दात बीआरएसचे समन्वयक माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे. जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर तेंलगणा राज्यात शेतकऱ्यांचा कांदा नेवून विकला म्हणून टीका केली जात असल्याचा आरोप केला आहे.

अनेकांच्या पोटात दुखायला लागलंय. पण आम्ही जेव्हा शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून देत होता, त्यावेळी महाराष्ट्र सरकारने तो खरेदी करावा, कांदा उत्पादकाला साडेतीनशे रुपये अनुदान द्यावं यासाठी आंदोलन केले, तर सरकारने स्पष्टपणे नकार दिला. (Marathwada) मग आम्ही शेतकऱ्यांना मदतीचा हात देत तेंलगणा सरकारशी बोलणी करून तिथल्या मार्केट कमिटीत ग्रेडनूसार कांद्याच्या विक्री अकराशे ते अठराशे रुपये भावात केली, तर सरकारला राग येण्याचे काय कारण.

आमच्यावर टीका करण्या आधी तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याला अकराशे रुपये भाव द्या, जाहीर केलेले साडेतीनशे रुपये अनुदान त्याच्या खात्यात जमा करा, मग आम्ही तेलंगणाला कांदा नेण्याचे बंद करतो. या सरकारला आपली इज्जत वाचवायची आणखी एक संधी देतोय, बघा जमतंय का? नाहीतर आम्ही पुन्हा तेंलगणात कांदा नेवून विकू, असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT