Raosaheb Danve-Eknath Shinde News Jalna Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : मुख्यमंत्र्यांच्या सभेला किती लाभार्थी आणणार सांगा, दानवेंचे अधिकाऱ्यांना टार्गेट..

Marathwada : तुम्ही जर नऊ हजार लाभार्थी आणले तर तुम्हाला लोकसभेचे तिकीटचं द्यावे लागेल.

सरकारनामा ब्युरो

Jalna : `शासन आपल्या दारी`, ही मोहीम सध्या राज्यात जोरात राबवली जात आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. (Raosaheb Danve News) येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती या माध्यमांतून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २५ जून रोजी आढावा घेण्यासाठी जालना येथे येत आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. (Jalna) यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात किती लाभार्थी आणणार? आकडा सांगा, असे म्हणत दानवे यांनी त्यांना टार्गेटच दिले. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

एका महिला अधिकाऱ्यास उद्देशून तुम्ही जर नऊ हजार लाभार्थी आणले तर तुम्हाला लोकसभेचे तिकीटचं द्यावे लागेल, असा टोला देखील दानवे यांनी यावेळी लगावला. (Eknath Shinde) बैठकीत उपस्थीत महिला अधिकाऱ्यांना उद्देशून दानवे म्हणाले, लाभार्थ्यांनी एकदा योजनेचा लाभ घेतला की तो पुन्हा तुमच्याकडे फिरकत नाही, अशा लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना कार्यक्रमाला आणावे लागेल.

तुमची यंत्रणा कामाला लावली तर ते शक्य आहे, आमचा ३५ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे तुमची यंत्रणा कामाला लावा, आणि कोण किती लाभार्थी आणणार ते मला सांगा? असे म्हणत दानवे यांनी हातात पेन घेवून प्रत्येक अधिकाऱ्याने सांगितलेला आकडा लिहून घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी व्हावी म्हणून शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्यांना सभेसाठी आणण्याचे आदेश रावसाहेब दानवे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT