Jayakwadi Dam Paithan Sarkarnama
मराठवाडा

जायकवाडीतून दहा हजार क्युसेकने पाणी सोडणार, जलसाठा ९३ टक्यांवर..

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद ः पैठण येथील नाथसागरातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. काल रात्री दहा वाजेपर्यंत धरणात ८८.३९ टक्के जलसाठ्याची नोंद झाली होती. तर दर तासाला ७२ हजार ४०७ क्युसेक एवढ्या पाण्याची आवक धरणात होत होती. आज सकाळी घेतलेल्या नोंदीनूसार जलसाठ्यात आणखी वाढ होऊन ती ९२.३१ टक्क्यांवर पोहचली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जायकवाडी प्रकल्प व पूर नियंत्रण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज सकाळीच चर्चा केली. त्यानूसार अकरा वाजता जायकवाडी धरणातून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणातील पाण्याची आवक किंवा घट याची वेळोवेळी माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.

काल २८ सप्टेंबर पासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच सद्यस्थीतीत देखील जोरदार पाऊसाचा ईशारा देण्यात आलेला आहे. आज सकाळी ७ वाजेपर्यंत जायकवाडीत एकूण ९२.३१ टक्के जलसाठा झाला असून यात आणखी भर पडत आहे. प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो.

त्यामुळे द्वार परिचलन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे लवकरच उघडावे लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानूसार आज सकाळी अकरा वाजता जायकवाडी धरणातून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास काढून घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT