Chhatrapati Sambhajinagar : नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशापयशावर मंथन आणि शिवसेना (Shivsena (UT) News) स्वतंत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात सद्यस्थिती यावर खुली चर्चा करण्यासाठी १२ मे रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढील दिशा ठरवण्यासाठी देखील हे शिबीर महत्वाचे ठरणार आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या शिबीराची माहिती दिली आहे. त्यानूसार १२ मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षांच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे एकदिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. (Marathwada) शिबिरास सकाळी १० वाजेपासून सुरुवात होणार असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर व कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरास महिला आघाडी व युवा सेनेसह उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख,उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतील. (Shivsena) या शिवाय नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनाही शिबीरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनी या एकदिवसीय शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन अंबादास दानवे, किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी, युवा सेना जिल्हायुवाअधिकारी हनुमान शिंदे, शुभम पिवळ, कैलास जाधव मच्छिंद्र देवकर यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.