Bharat Jodo Rally News Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chvan On Bharat Jodo : राहुल गांधींच्या `भारत जोडो`, ची वर्षपुर्ती ; कोट्यवधी ह्रदये एकत्र केली..

Jagdish Pansare

Marathwada Political News : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या `भारत जोडो`, यात्रेची चर्चा जगभर झाली. (Bharat Jodo News) आज या यात्रेची वर्षपुर्ती आहे. या निमित्ताने या यात्रेचा एक भाग असलेले आणि महाराष्ट्रातील प्रवासाचे साक्षीदार ठरलेले नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात्रेच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी या संदर्भात ट्विट करत `भारत जोडो` ने कोट्यवधी ह्रदये एकत्र केल्याचे म्हटले आहे. १४५ दिवस, १२ राज्ये, २ केंद्रशासित प्रदेश आणि ४०८१ किमी - भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पाथब्रेकिंग चळवळीने कोट्यवधी ह्रदये एकत्र केली आणि एकता आणि सौहार्दाकडे वाटचाल करायला शिकले.

अब्जावधी-सशक्त राष्ट्राच्या हृदयाला प्रेमाने भरून टाकणारी ही यात्रा ठरली, अशा भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. (Rahul Gandhi) देशातील सद्य परिस्थिती, राजकीय वातवरण आणि (Congress) काॅंग्रेसला मिळणारा पाठिंबा यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सिंहाचा वाटा आहे.

देशातील सर्वात शक्तीशाली पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या सत्तेला काही राज्यांमध्ये हादरे देण्याचे काम देखील `भारत जोडो` च्या माध्यमातून झाले. कर्नाटक राज्यात भाजपच्या सत्तेला सुरुंग हा या यात्रेचाच परिणाम होता. सध्या भाजपविरोधात देशपातळीवर स्थापन झालेल्या `इंडिया` आघाडीचा अंजेडा देखील `भारत जोडो` यावरच आधारित आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT