पुणे ः एकीकडे राजकारणातील मंडळी व्यसनमुक्तीचे उपदेश देतात, तर काहीजण चक्क या व्यावसायिकांना प्रोत्साहन देतात. जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतेच एका रेस्टाॅरंट अॅन्ड बारचे उद्धाटन केले. याचे फोटो देखील त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून व्हायरल केले आहेत.
एखाद्या पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर उद्घाटन, फीत कापण्यात काही गैर नाही. पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना यातून चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी देखील घेणे आवश्यक असते.
विजयादशमीच्या मूहुर्तावर जालना शहरातील ढवळेश्वर येथील एका बार रेस्टाॅरंटचे उद्घाटन गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक लहान मोठ्या उद्योग-व्यवसायामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार प्राप्त होण्यासही मदत होत असते.
म्हणूनच युवा पिढीने देखील अधिकाधिक संख्येने व्यवसाय व उद्योगांकडे वळावे, असे आवाहन देखील गोरंट्याल यांनी या उद्धाटन प्रसंगी केले. गोरंट्याल यांनी केलेल्या उद्घाटन आणि आवाहनांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.