<div class="paragraphs"><p>Laxman Mane-Narendra Modi</p></div>

Laxman Mane-Narendra Modi

 

Sarkarnama

मराठवाडा

सामान्याला जमिनीचा तुकडा खरेदी करणे कठीण; मालमत्ता खरेदी कायदा आणा

उमेश वाघमारे

जालनाः देशात आज ही २८ टक्के लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, २५ टक्के लोक कसेबसे उदर्निवाह करत आहेत. (Jalna)असे असाताना शासन खासगीकरण करून सामन्य नागरिकांचे जगणे कठीण करत (Marathwada) असल्याने आमचा खासगीकरणास विरोध आहे, अशी भूमिका महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने (Maharashtra) यांनी मांडली.

पत्रकार परिषदेत बोलतांना माने यांनी केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाला विरोध दर्शवला. त्याचे तोटे सांगतांना त्यांनी श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढत चाललेली दरी यावरही भाष्य केले. माने म्हणाले, केंद्र शासनाने मालमत्ता खरेदीची मर्यादी घालणारा कायदा केला पाहिजे. आज देशातील दहा टक्के लोकांकडे ९० टक्के संपत्ती आहे. तर देशातील ९० टक्के लोकांकडे केवळ दह टक्के संपत्ती आहे.

भाडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले असून सामान्य नागरिकांना जमिनीचा तुकडाही खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे भूमिहीन असणाऱ्यांना शासनाने मंदिर संस्थान, गायराण, वनविभागाची जमीन कसण्यासाठी द्यावी.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवून शिक्षाणाचे खासगीकरण थांबवावे, असे आवाहन करतांनाच बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळावायासाठी लढ देणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले. शासन नोकर भरती करण्यास तयार नाही, उच्चशिक्षीत तरूणांना कंत्राटी पद्धतीने शासनाकडून नोकरी दिली जाते.

त्यात एका संगणकामुळे वीस जणांचा रोजगार गेला आहे, त्यामुळे संगणकाला आपला विरोध आहे. दहा टक्के संपत्तीधारकांसाठी तयार केल्या जाणाऱ्या जलदगती महामार्गालाही आपला विरोध असल्याचे माने म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT