Railway State Minister Raosaheb Danve News
Railway State Minister Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : सिंकदराबाद ते छत्रपती संभाजीनगर पहिली इलेक्ट्रीक रेल्वे धावणार..

नवनाथ इधाटे

Marathwada : इंधनाची बचत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्तपादन सुरू आहे. आता त्याच धर्तीवर सिकंदराबाद ते छत्रपती संभाजीनगर पहिली इलेक्ट्रिक रेल्वे धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. मी मंत्री झाल्यानंतर ८५० कोटी रुपये मंजूर करून रेल्वे इलेक्ट्रिकच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर ते सिकंदराबाद पर्यंत मार्चअखेर पर्यंत सुरू करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

फुलंब्री येथील एका कार्यक्रमात बोलतांना दानवे म्हणाले, जालना येथील नवीन रेल्वे स्टेशनसाठी १७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. (Pm Modi) मोदी सरकार आणि शिंदे - फडणवीस सरकार तुम्हाला मदत करायला तयार आहे. आमच्या सरकारने अतिवृष्टीसाठी तीन हेक्टर पर्यंत प्रती हेक्टर १३ हजार रुपये दहा मार्चपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणा आहे. (Railway) या संदर्भात मी संबंधित विभागाच्या सचिवाशी बोललो आहे.

विजेसाठी जालना येथे पाचशे तर छत्रपती संभाजीनगरला ७५० कोटी रुपये दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जास्तीच्या दाबाने विद्युत पुरवठा मिळणे सहज शक्य होणार आहे. खासदार व आमदार हे तुमचे सालदार असून ते चांगले काम करता का नाही याची तुलना मतदारांनी वेळेवर करायला पाहिजे. आम्ही जर कुठे चुकत असू तर आम्हाला सांगितले पाहिजे.

तुमचे खासदार व आमदार चांगले साल घालवताय का? अशी विचारणा उपस्थितांना केली असतांना सर्वांनी होकार देत दानवे यांना प्रतिसाद दिला. तर सर्व नागरिकांना फिल्टरचे स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे सांगत आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, फुलंब्रीकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी जलयुक्त शिवार योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली.

त्यामुळे शेतकरी आता वर्षभरात एकाच शेतात तीन - तीन पिके घेतात. जलयुक्त शिवार योजनेमुळे सिंचन क्षमता वाढली आहे. फुलंब्री नगरपंचायतचा जेवढा विकास झालं तेवढा कोठेही झाला नाही. सुसज्ज इमारत बांधण्यात आली. फुलंब्री धरणाचे नदीत जाणारे पाणी अडवून शेतकऱ्यांना बंद नलिकेद्वारे दिल्याने शेतकरी सुखावला आहे. घरकुलाचे काम दर्जेदार करून घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT