Mp Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Cabinet Meeting : सरकारला जनतेशी देणे-घेणे नाही, नामांतराच्या राजकारणातून फक्त सत्ता टिकवायची...

AIMIM News : मराठवाड्यात आल्यानंतर ते इथल्या प्रश्नावर काही बोलले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवणार?

Jagdish Pansare

Aurangabad Political News : राज्यातील जनता, शेतकरी, तरुण, विद्यार्थी सगळेच वेगवेळ्या अडचणींतून जात आहेत. पण सरकारला या लोकाशी काही देणे-घेणे नाही. (Cabinet Meeting News) त्यांना फक्त औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करून राजकारण करायचे आहे. धार्मिक वाद आणि जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून सत्ता टिकवायची आहे, त्यासाठीच ते इथे आले आहेत, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर केला.

आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा, ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे त्यांना तत्काळ परत द्या, या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पोलिसांनी भडकलगेट येथे अडवला. या वेळी माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

मराठवाड्यात होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही केवळ दिखावा आहे. (Aimim) या सरकारला शेतकरी, सर्वसामान्यांशी काही देणे-घेणे नाही. (Marathwada) विकासाशीदेखील यांचा काही संबंध नाही. केवळ नामांतरावरून राजकारण आणि त्यातून सत्ता एवढाच यांचा अंजेडा आहे, त्यासाठीच ते इथे आले आहेत.

मराठवाड्यात आल्यानंतर ते इथल्या प्रश्नावर काही बोलले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवणार? ज्या ठेवीदारांच्या आयुष्यभराची कमाई आदर्श घोटाळ्यात बुडाली, त्यांना पैसे कधी मिळवून देणार यावर सरकारचे मंत्री काही बोलायला तयार नाहीत. आज अनेक विभागांमध्ये कंत्राटी युवक नोकऱ्या करत आहेत.

वर्षानुवर्षे त्यांना कुठल्याही सुविधा सरकारकडून पुरवल्या जात नाही. त्यांचे पुढचे भविष्य काय? त्यांना सरकार नोकऱ्यांमध्ये कायम करणार का? असे अनेक प्रश्न आहेत. पण त्यांनी इथे येऊन काय केले, तर नामांतर. त्यामुळे या सरकारकडून आपल्याला काही अपेक्षा नाही. आमची लढाई आम्हीच लढू आणि ती जिंकूही, असा विश्वास इम्तियाज यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT