Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope Sarkarnama
मराठवाडा

माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण; राजेश टोपे सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कारने सन्मानित

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माझ्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या आनंदाच्या क्षणांपैकी आजचा हा क्षण आहे. जागतिक पातळीवरील सर्व संसद व विधानसभा सदस्यांसाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ हि संस्था कार्यरत आहे. (Rajesh Tope) या संस्थेचे एक युनिट महाराष्ट्र विधिमंडळात देखील कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने मला २०१६-१७ वर्षासाठी सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.(Jalna)

६ जुलै २०२१ रोजी हा पुरस्कार जाहीर झाला होता. (Marathwada) या पुरस्काराचे सन्मान चिन्ह आज प्राप्त झाले. हा पुरस्कार मी माझ्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील जनतेला अर्पण करत आहे. अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रकुल संसदीय मंडळ या संस्थेच्या वतीने टोपे यांना २०१६-१७ वर्षासाठी सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज विधान भवन येथे हा पुरस्कार विधान परिषेदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते टोपे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, आमदार उपस्थित होते. लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी दिलेले योगदान, सामाजिक जाणीवा, प्रखर बुद्धीमता व उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या जोरावर राज्यातील जनेतेचे प्रश्न टोपे यांनी विधीमंडळात मांडल्याचा उल्लेख त्यांना देण्यात आलेल्या सन्मान पत्रात करण्यात आला आहे.

विषयांचा गाढा अभ्यास, जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण,विधिमंडळ कामकाजाचे सखोल ज्ञान आणि संसदीय आयुधांचा योग्य वापर करून आपण जनतेच्या विषयांना न्याय दिला. विधीमंडळाचे कायदे व नियमांचे पालन करत, विधीमंडळाच्या परंपरा व प्रतिष्ठेचा कायम विचार करून आपली वाटचाल राहीली.

आपल्या वक्तृत्वासाठी आपल्याला हा पुरस्कार देतांना आम्हाला आनंद होत असल्याचे देखील, सन्मान पत्रात म्हटले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर टोपे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आपला पुरस्कार घनसावंगी मतदारसंघातील जनतेला अर्पण करत असल्याचे सांगत हा आपल्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाच्या क्षणांपैकी एक असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT