High Court, Aurangabad News
High Court, Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

High Court : सुटीच्या दिवशी सुनावणी घेतली, अन् कैद्याला वडिलांचे अखेरचे दर्शन घेता आले..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : कैद्याच्या अर्जाची दखल घेऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर संत यांच्या खंडपीठाने (High Court) शनिवारी सुटी असताना सकाळी सुनावणी घेतली. कैद्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देवून जामीन दिला. त्यामुळे त्या कैद्याला त्याच्या वडिलांचा अंत्यविधी व इतर धार्मिक विधी पार पाडता आले.

मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली १९ जानेवारी २०२३ पासून कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी प्रदीप अर्जुन हवाळे याच्या वडिलांचे २७ जानेवारीला रात्री निधन झाले. (Aurangabad) अंत्यविधीमध्ये सहभागी होता यावे यासाठी त्याने दाखल केलेल्या अर्जावर खंडपीठाने तात्पुरता जामीन मंजूर केला. (Marathwada)

२ नोव्हेंबर २०१३ रोजी दोन दुचाकींच्या अपघातात रवींद्र शिंदे यांचे निधन झाले होते. या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली जामखेडच्या न्यायालयाने ३० मे २०१६ रोजी प्रदीपला दोषी ठरवून भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता.

त्याने दंडाची रक्कम भरून सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता श्रीगोंदा सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २०२३ रोजी अपील फेटाळले. २०१६ पासून २०२३ दरम्यान तो जामिनावर होता. सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर १९ जानेवारीला त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रदीपतर्फे ॲड. कमलाकर सूर्यवंशी यांनी तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र सानप यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT