Raosaheb Danve On ODisha Railway Accident News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve On ODisha Railway Accident : रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी, अपघातग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत...

Railway News : या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra News : ओरिसा राज्यातील बालासोरजवळ झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस अपघाताने संपुर्ण देश हादरला आहे. (Raosaheb Danve On ODisha Railway Accident) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार देखील केले जात आहेत.

देशातील सर्वातमोठी रेल्वे दुर्घटना म्हणून देखील या अपघाताकडे पाहिले जात आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी या अपघाता संदर्भात मुंबईत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. (Railway State Minister) रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी असून घटनास्थळी मदत कार्य वेगाने सुरू असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवशांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात असून अशा दुःखाच्या प्रसंगी आम्ही मृतांच्या कुटुंबियांसोबत आहोत. (Maharashtra) जखमीची प्रकृती लवकर बरी व्हावी, हेच ईश्वराकडे मागणे असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

दरम्यान, दानवे यांचा अपघातग्रस्त भागाचा दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. महाराष्ट्रात राहूनच ते स्थितीचा आढावा घेत आहेत. ओडिशा राज्याच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात अडीचशे पेक्षा जास्त प्रवाशांचा बळी गेला असून जवळपास एक हजार जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT