Ncp Mla Prakash Solanke With Education Officer In School News. Sarkarnama
मराठवाडा

शाळा प्रवेशसाठी सुरू होती लूट ; आमदार, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले स्टींग ऑपरेशन

आमदार सोळंके, शिक्षणाधिकारी कुलकर्णी व पोलिसांनी संबंधित शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून १ लाख ७६ हजार रूपये रोख जप्त केले. (Beed News)

सरकारनामा ब्युरो

बीड : माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरीता प्रेवश शुल्काच्या नावाखाली लुट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी व पोलिसांसह स्टिंग ऑपरेशन करत पालकांकडून पावणे दोन लाख रुपये उकळणाऱ्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले. (Beed) या कारवाईत शिक्षकांकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली घेतेलेल १ लाख ७६ हजार रुपये रोख देखील जप्त करण्यात आले.

सिध्देश्वर शिक्षण संस्था ही जिल्ह्यातील नावजलेली संस्था म्हणून ओळखली जाते. पहिल्यांदाच या संस्थेत निवडणुका झाल्या. (Marathwada) या संस्थेच्या शाळांमध्ये प्रेवश घेण्यासाठी मोठी गर्दी असते. नेमकं हेच हेरून येथील शिक्षकांनी प्रवेश शुल्कच्या नावाखाली पालकांची लूट चालवल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या संदर्भात काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय व बीड शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी देखील केल्या होत्या. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या देखील कानावर हा प्रकार आला होता. सर्वसामान्यांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी त्यांनी पोलिस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत स्टिंग आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

आज येथील वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून एका प्रवेशासाठी त्यांच्याकडून पंधरा ते विस हजार रूपये घेतले जात होते. हे समजताच शिक्षणाधिकारी कुलकर्णी व आमदार सोळंके पोलिसांना सोबत घेत वैष्णवी मंगल कार्यालय गाठले. तेव्हा तिथे पालकांकडून प्रवेशासाठी शाळेचे काही शिक्षक-कर्मचारी पैसे घेत होते.

आमदार सोळंके, शिक्षणाधिकारी कुलकर्णी व पोलिसांनी संबंधित शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून १ लाख ७६ हजार रूपये रोख जप्त केले. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती देखील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्याकडून देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT