Hingoli News : मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. "मराठा समाजाने छगन भुजबळला बळ देण्याचे काम करू नये," असे पाटील म्हणाले. हिंगोलीमध्ये मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी जरांगे पाटील दाखल झाले होते. या वेळी त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला. (Latest Marathi News)
हिंगोली येथे जरांगे पाटील म्हणाले, 'अनेक जातींमधल्या पोट जातींना आरक्षण दिले गेले आहे. त्याप्रमाणेच मराठा ही जात कुणबींची पोट जातीचा घटक होऊ शकणार नाही का? यासाठी कोणत्याही दस्तावेजाची गरज भासणार नाही. फक्त राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे, तीच आमच्याकडे मागील ७० वर्षांपसून नाही,' असे जरांगे म्हणाले.
कुणबी दाखले तर द्यावेच लागणार -
आतापर्यंत ज्यांनी आरक्षणाचे लाभ घेतले त्यांच्याकडून कसलेही पुरावे घेतले नाही. एका गावात एकाचा जरी पुरावा आढळून आला, तर संपूर्ण गावाला ओबीसी आरक्षण वा प्रमाणपत्र द्यावेच लागतील. सरकारमधील प्रतिनिधींनी सांगितलं होतं की, आरक्षण मिळवण्यासाठी काही निकष आहेत, काही आधार लागतो, पुरावा मांडावा लागतो. आता पाच हजार पुरावे आढळून आले आहेत. मराठा समाजाचं सोनं झालं आहे. यामुळे आता कसलीही बनवाबनवी न करता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, असे जरांगे म्हणाले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.