Omicron In Nanded

 

Sarkarnama

मराठवाडा

दक्षिण अफ्रिकेतून नांदेडात आलेल्या `त्या` दोघांचा ओमीक्राॅन अहवाल पाॅझीटीव्ह

आरोग्य विभागाने नांदेड जिल्ह्यात विदेशातून आलेल्या तीनशेहून अधिक रुग्णांना विलगीकरणात ठेवून हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. (Nanded Omicron)

सरकरानामा ब्युरो

नांदेड ः हिमायतनगर येथील कोरोना पाॅझीटीव्ह आलेल्या तीन रुग्णांपैकी दोघांचा जिनोम सिक्वेसिंग अहवाल ओमीक्राॅन (Omicron) पाॅझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात ओमीक्राॅनचा शिरकाव झाला आहे. जिल्हा प्रशासनाने आज या दोन रुग्णांचे ओमीक्राॅन अहवाल पाॅझीटीव्ह आल्याचे जाहीर केले.

गेल्या पंधरा दिवसांत नांदेड (Nanded) जिल्ह्यात विदेशातून आलेल्यांची संख्या तीनशेहून अधिक होती. देशात आणि राज्यात ओमीक्राॅन संसर्गाचा वाढता धोका आणि विदेशी प्रवासामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेत या सगळ्यांची कोरोना चाचणी केली होती. (Marathwada) पैकी हिमायतनगर येथील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर या तीनही रुग्णांचे जिनोम सिक्वेनसिंग पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या रुग्णांच्या अहवालाकडे संपुर्ण जिल्हा आणि मराठवाड्याचे लक्ष लागून होते. अखेर तीन रुग्णांपैकी दोघांना ओमीक्राॅन संसर्ग झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हे दोघेही दक्षिण अफ्रिकेतून आले होते.

आरोग्य विभागाने नांदेड जिल्ह्यात विदेशातून आलेल्या तीनशेहून अधिक रुग्णांना विलगीकरणात ठेवून हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या सर्वांच्या कोरोना चाचणीत तिघांचे अहवाल वगळता इतरांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. हिमायतनगर येथील तिघांचे जिनोम सिक्वेनसिंग नमुने पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

आज यापैकी दोघांना ओमीक्राॅन संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात ओमीक्राॅनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे, तर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT