Pritam Munde News, Beed
Pritam Munde News, Beed sarkarnama
मराठवाडा

MP Pritam Munde News : विरोधी पक्षाला माझ्या विरोधात उमेदवार मिळत नाही, यातच अर्धी लढाई जिंकले..

सरकारनामा ब्युरो

Beed News : महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कुणाला मिळणार? यावरून बराच खल सुरू आहे. (MP Pritam Munde News) राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जावू शकते, असे देखील बोलले जाते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार प्रतीम मुंडे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत चांगलीच टोलेबाजी केली.

विरोध पक्षाला माझ्या विरोधात उमेदवार मिळत नाही, यातच अर्धी लढाई मी जिंकले, असा टोला प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी लगावला. मी डाॅन किंवा गुंड नाही, मग विरोधकांना उमेदवार का मिळत नाही? असा चिमटा देखील त्यांनी काढला. (Beed News) राज्यात सध्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. सहाजिकच बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार याची चर्चा देखील या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडीत, धनंजय मुंडे यांची नावे घेतली जात आहेत. (Bjp) मुंडे यांनी दोन दिवसांपुर्वीच आपण लोकसभा लढवणार नाही, आपल्यासाठी दिल्ली अजून दूर असल्याचे सांगितले होते. एकीकडे पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा लढवणार नाही असे सांगितले खरे, पण त्याच दिवशी दुसऱ्या एका कार्यक्रमात कुठल्या बुथवर लोकसभेला कोणत्या पक्षाला किती मते मिळतील याचे गणित आपल्याला माहित असल्याचे सांगितले.

यातून आपला लोकसभेसाठीचा अभ्यास किती पक्का झाला आहे, हे तर त्यांना अधोरेखित करायचे नव्हते ना? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. अशावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील विरोधकांना आव्हान दिले आहे. तगडी फाईट असेल तर लढायलाही आनंद वाटतो. माझ्या समोर विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाही, मी डॉन तर नाही? अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

धनंजय मुंडे यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तरीही काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिल. विरोधी उमेदवार हा चांगला असावा, आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांचे आपल्याला कुठेलच आव्हान नसल्याचे सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील विकासकामांवरून धनंजय मुंडे यांच्याकडून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. मी काम करते का नाही याचा लेखाजोखा जनता देईल. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्जा गेलाय ज्यांनी असं सांगितले जाते. याचा दुसरा अर्थ या आधी हा दर्जा होता. मग त्याचे कागदपत्रे असतील तर ज्यांनी दर्जा गेल्याचा दावा केला त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे. वाद निश्चित आहे, दुर्दैवाने हा वाद एकट्या परळी ज्योतिर्लिंगाचा नाही अनेक ज्योतिर्लिंगांविषयी संभ्रम आहेत. केंद्राच्या यादीत परळीचे ज्योतिर्लिंग यावे म्हणून मी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT