MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel Warns: ठेवीदारांच्या आयुष्यभराच्या कमाईचा प्रश्न, कोणालाही सोडणार नाही..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यात हजारो ठेवीदारांच्या आयुष्यभराच्या कमाईचा प्रश्न आहे. (AIMIM Protest News) पोलिस, सहकार विभागातील लोक ठेवीदारांऐवजी घोटाळा करणाऱ्या संचालकांना मदतीची भूमिका घेत आहे. पण मी कोणालाही सोडणार नाही, हे लक्षात ठेवा असा दम खासदार इम्तियाज जलील यांनी भरला.

वर्षानुवर्ष सहकार विभागाच्या नाकावर टिच्चून आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळाने घोटाळा (Scams) केला, सामन्यांची दोनशे कोटीची कमाई गिळली आणि आता ते जामीनावर मोकाट सुटणार आहेत. (AIMIM) पोलिस, सहकार विभागाचे अधिकारी ठेवीदारांच्या बाजूने आहेत की ? घोटाळा करणाऱ्यांच्या ? असा संतप्त सवालही इम्तियाज यांनी केला.

ठेवीदारांच्या घामाचा पैसा परत मिळवून देण्याची शपथ घेतलेल्या इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सहनिंबधक कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. या थाळीनादचा आवाज चांगला घुमला, सहनिंबधक कार्यालयात इम्तियाज यांचा रुद्रावतार पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाचावर धारण बसली.

त्यानंतर इम्तियाज यांनी आपला मोर्चा थेट पोलिस आयुक्तालयाकडे वळवत आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी केली. विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी इम्तियाज यांच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. पण आता माघार नाही, घोटाळा करणाऱ्यांबरोबरच ज्या सहकार आणि पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला हातभार लावला त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय थांबणार नाही, असा इशाराही इम्तियाज यांनी दिला.

सहकार कायद्याच्या ८९ अतंर्गत आदर्श पतसंस्थेच्या लेखा परीक्षणाचा अहवाल वेळोवेळी का दिला नाही? २०१६ चा अहवाल २०२३ मध्ये कसा दिला? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी सहनिबंधकांची कोंडी केली. शहरात आणि ग्रामीण भागात आदर्श पतसंस्थेच्या वीसपेक्षा जास्त शाखा विनापरवाना सुरू होत्या, तेव्हा सहकार विभाग झोपा काढत होतात का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार इम्तियाज यांनी केला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सहकार आणि पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT