Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Nilangekar V/s Nilangekar : `ते` तर देशमुखांच्या ताटाखालचे मांजर ..

सरकारनामा ब्युरो

Latur : निलंगा मतदारसंघात यापुर्वी कोणी ढवळाढवळ करत नव्हत, राजकारणाचा एक आदर्श होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) दादांचा जिल्ह्यावर दबदबा होता, पण आता काही लोक लातूरच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत, अशी टीका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले काका काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्यावर अनेक प्रकल्प उभारून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असून येत्या २३ तारखेला रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या हस्ते नवीन प्रकल्प उभा करून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.

निलंगेकर म्हणाले, अतिशय कष्टातून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अंबुलगा येथील माळरानावर साखर कारखान्याची उभारणी केली होती. (Sambhajipatil Nilangekar) मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा कारखाना बंद पडला होता व तालुक्यासह परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा प्रश्न भेडसावत होता. (Latur) ओंकार साखर कारखान्याच्या माध्यमातून पुन्हा आंबुलगा सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न मिटला याचे समाधान आहे.

साखर कारखान्यावर वेगवेगळ्या प्रोजेक्टची निर्मिती करून महाराष्ट्रात एक आदर्श साखर कारखाना बनविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. साखर निर्मिती सोबतच कारखान्यावर १५ डीपीडीचा सीएनजी गॅस निर्मिती, २०० मॅट्रिक टन खताचा कारखाना व दीडशे के. एल. डिस्टलरी प्रोजेक्ट उभा करणार असून या तिन्ही प्रोजेक्टचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. कारखाना या हंगामात सुरू झाला असून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पंचवीशे रुपयाचा भाव देणारा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला, असल्याचा दावा देखील निलंगेकर यांनी यावेळी केला.

तसेच येणाऱ्या हंगामात निलंगा मतदारसंघातील ऊस शिल्लक राहू देणार नाही, असे अश्वासन देखील त्यांनी दिले. निलंगा मतदार संघातील तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा व या भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच हे नवीन तीन मोठे प्रकल्प आपण उभे करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे दोन पॅनल आहेत, या संदर्भात विचारले असता, लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा अधिकार असल्याचे निलंगेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT