Dhnanjay Munde-Amit Deshmukh, Dhananjay Munde wished Amit Deshmukh a happy birthday, Dhnanjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

लातूर-बीड मैत्रीची परंपरा कायम; धनंजय मुंडेनी दिल्या अमित देशमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

हे दोघे फारसे एकत्र दिसत नाहीत, त्यांचे किस्से देखील ऐकण्यात येत नाहीत, पण तरी देखील या दोन तरुण नेत्यांमध्ये संवाद असतो. (Dhnanjay Munde)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचा आज वाढदिवस. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. (Amit Deshmukh) यात एका खास शुभेच्छाचा देखील समावेश आहे, त्या म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय व बीड जिल्ह्याचे पलाकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्या. `आमचे मित्र तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखजी, आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. (Marathwada) आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना`, असे ट्विट करत मुंडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. (Dhnanjay Munde News)

या शुभेच्छा देतांना अमित देशमुख यांच्यासोबतचा दिलखुलास हास्य दर्शवणारा फोटो देखील पोस्ट केला आहे. या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बोटावर मोजण्या इतक्या राजकीय नेत्यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्यांना राजकारणातील दो हंसो का जोडा म्हणून ओळखले जाते असे दिवंगत विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे.

या शिवाय अनेक राजकारण्यांमध्ये मैत्रीचे धागे जुळले गेले असले तरी सर्वाधिक चर्चा झाली ती देशमुख-मुंडे यांच्या मैत्रीचीच. हे दोघे एका व्यासपीठावर आले की त्यांच्या समर्थकांसाठी एक पर्वणीच असयाची. मग काॅलेज जीवनापासून ते पुण्यातील उच्चशिक्षण आणि राजकारणात आल्यानंतरचे किस्से या दोघांच्या तोंडून ऐकण्याची मजाच निराळी होती.

आज गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख दोघेही हयात नाहीत. पण त्यांच्या या मैत्रीचा धागा घट्ट करत ही पंरपरा पुढे नेण्याचे काम गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय व विलासरावचे चिरंजीव अमित देशमुख यांनी पुढे चालवली आहे. हे दोघे फारसे एकत्र दिसत नाहीत, त्यांचे किस्से देखील ऐकण्यात येत नाहीत, पण तरी देखील या दोन तरुण नेत्यांमध्ये संवाद असतो हे अनेकदा दिसून आले आहे.

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात हे दोघेही आहेत. एकाकडे सामाजिक न्याय तर दुसऱ्याकडे वैद्यकीय शिक्षणाची जबादारी आहे. आज आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतांनाच्या ट्विटमध्ये मुंडे यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यातून या दोघांमधील मैत्रीच्या घट्ट नात्याची प्रचिती येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT