Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur Sarkarnama
मराठवाडा

Latur : जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेणार अन् अध्यक्ष वारकरी सांप्रदायाचा करणार..

राम काळगे

निलंगा : राजकारणात पदे महत्त्वाची नाहीत, मिळेल त्या पदावर राहून सर्वसामान्य जनतेच्या -हदयात कार्यकर्त्यांनी स्थान निर्माण करावे, असे अवाहन करून स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांना नाही तर निष्ठावंताना संधी दिली जाणार आहे. (Latur) ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावे, दारात उभे राहून अडवणूक करू नका, असा इशारा बांडगूळ कार्यकर्त्यांना माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी (Sambhaji Patil Nilangekar) दिला.

आगामी काळात लातूर जिल्हा परिषद पुन्हा एकदा भाजपाच्या ताब्यात घेणारच, असा निर्धार निलंगा मतदार संघातील बुथ प्रमुखाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला. (Marathwada) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा बैठकीत ते बोलत होते. निलंगेकर म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शंभर टक्के शौचालय बांधण्यात आले असून स्वच्छतेतून जनतेच्या आरोग्याची काळजी आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

बॅनरबाजी न करता लोकांची सेवा करा, देशातील प्रत्येक माणूस द्रारिद्र्यातून बाहेर आला पाहिजे. येणाऱ्या काळात प्रत्येक बुथ प्रमुखाला दहा लाखाचे सुरक्षाकवच देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. अक्का फाँडेशनच्या माध्यमातून दहा हजार सातशे लोकांची डोळे तपासणी केली असून तीनशे पेक्षा जास्त चष्माचे वाटप करण्यात आले आहे. तर पंधराशे शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

लोकांना सेवा देणारा कार्यकर्ता हा भाजपाचा असला पाहिजे, असे आवाहन देखील निलंगेकर यांनी केले. तालुका व मतदार संघाला कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, व गोगालगाय असे तीन प्रकारचे संकट आले. या तीन्ही संकटापैकी शेतकऱ्यांना एका संकटाची नुकसानभरपाई मिळणार आहे. यापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही.

शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असून शेतकरी हिताचेच निर्णय घेणारे आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत लातूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवून पूर्वी शेतकरी असलेल्या व्यक्तीला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संधी दिली होती. आता वारकरी सांप्रदायातील व्यक्तीला जिल्हा परिषद अध्यक्षपदी संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे स्वप्न आत्मनिर्भर भारत देश करण्याचे आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. जल जीवन मिशन, अटल भूजल या योजनेतून लातूर जिल्ह्याला दहा कोटी मंजूर झाले असून या माध्यमातून लातूर जिल्ह्याला पाणी टंचाई पासून मदत मिळणार असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT