Opposistion Leader Ambadas Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve- Bhumre News : पालकमंत्री आहात, जहागीरदार समजू नका ; दानवेंनी भुमरेंना ठणकावले..

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कशाप्रकारे निधी वाटप करण्यात आलेला आहे. (Ambadas Danve- Bhumre News) याची तालुकानिहाय माहिती देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैठकीदरम्यान केली. यावर पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा पारा चढला, त्यांनी उत्तर देण्याऐवजी वाद घालण्यास सुरवात केली.

यावरून या दोघांमध्ये चांगलीच खंडाजंगी झाली. ` तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, जहागीरदार नाही`, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आणि बैठकीचे वातावरण तापले. (Shivsena) डीपीडीसीची बैठक आज चांगलीच वादळी झाली. असमान निधी वाटपाच्या मुद्यावरून पालकमंत्र्यांना (Gurdian Minister) जाब विचारायचा हे ठरवूनच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात आले होते.

तालुकानिहाय निधी वाटपाची आकडेवारी त्यांनी पालकमंत्र्यांकडे मागितली आणि तिथेच वादाची थिणगी पडली. (Aurangabad) दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. हातवारे करत बोलू लागले, तेव्हा अचानक दानवे खुर्चीवरून उठले आणि तावातावाने बोलू लागले. त्याला भुमरेंनी देखील प्रत्युत्तर दिले. पालकमंत्री असले तरीही तुम्ही जिल्ह्याचे जहागीरदार नाहीत.

आपल्याच मतदारसंघात जास्तीचा निधी देण्याबरोबर इतरही तालुक्यात समान निधी वाटप केला पाहिजे. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघावर अन्याय न करता न्यायपूर्वक निधी द्या, अशी मागणी दानवे यांनी लावून धरली.

परंतु या जिल्ह्याचा मी जहागीदार असून माझ्या संमतीशिवाय कोणतेही कार्य या जिल्ह्यात होऊ शकत नाही, असा आव पालकमंत्री आणत आहेत, असा आरोप दानवे यांनी बैठकीत केला. लोकसंख्येनुसार सर्व तालुक्यांना समान निधी दिला जावा असा शासकीय नियम आहे. त्याचे पालन पालकमंत्र्यांकडून केले जात नाही, ते केले जावे अशी मागणी देखील दानवे यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT