marthwada Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : स्वातंत्र्यापासून मराठवाड्यातील 'या' मतदारसंघांना लाभल्या नाहीत महिला खासदार!

Women MP In Marathwada : राजकीय पक्षांची अनास्था याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते ; मावळत्या लोकसभेत मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक एकमताने मंजूर करून घेतले आहे.

Jagdish Pansare

Marathwada Loksabha MP : एकीकडे मावळत्या लोकसभेत मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक एकमताने मंजूर करून घेतले. या विधेयकामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. याचा लाभ 2029 मध्ये देशभरातील नारी शक्तीला होणार आहे. यामुळे लोकसभा आणि विधानसभेत महिला खासदारांची संख्या वाढणार आहे. ही आनंदाची बाब असली तरी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काही मतदारसंघ असे आहेत, जिथे अद्याप एकही महिला खासदार म्हणून निवडूनआलेली नाही.

राजकीय पक्षांची अनास्था याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना(Jalna), परभणी हे तीन लोकसभेचे असे मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघातून आजपर्यंत एकही महिला खासदाराला प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली नाही.

या उलट बीड, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या मतदारसंघात बोटावर मोजण्या इतक्या का होईना पण महिलांना उमेदवारी देऊन त्यांना संसदेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यात काँग्रेस, शिवसेना, भाजप(BJP) हे पक्ष आघाडीवर राहिले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघातून एकही महिला खासदार अद्याप निवडून आलेली नाही. राजकीय पक्षांनी लोकसभेची उमेदवारी देताना कायम पुरूषांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

जालना, परभणी लोकसभा मतदारसंघात हेच चित्र पाहायला मिळते. तर दुसरीकडे मराठवाड्यातील आर्थिक, औद्योगिक विकासात मागास समजल्या जाणाऱ्या बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली व नांदेड या मतदारसंघातून मात्र महिलांना संधी देण्यात आली.

बीड लोकसभा(Beed Loksabha) मतदारसंघातून काँग्रेसने केशरकाकू क्षीरसागर यांना तीन वेळा उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. 80-84, 84-89 आणि 91-96 या काळात त्यांनी बीडचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले. याच बीड जिल्ह्यातून भाजपने रजनी पाटील यांना 1996 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन संसदेत पाठवले होते. त्यांचा कार्यकाळ 96-98 दरम्यान राहिला. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये भाजपने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डाॅ. प्रीतम मुंडे यांना सलग दोनवेळा उमेदवारी दिली आणि लोकसभेवर पाठवले.

आता पंकजा मुंडे(Pankaja Munde) 2024 मध्ये भाजपच्या उमेदवार होत्या. बीड जिल्ह्याने सर्वाधिक महिला खासदार आतापर्यंत निवडून पाठवल्या आहेत. त्याखालोखाल हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सुर्यकांता पाटील यांना दोन वेळा उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. 98-99 आणि त्यानंतर 2004-09 या काळात त्या खासदार होत्या. त्याआधी 91-96 या पाच वर्षात त्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.

लातूर या काँग्रेसचा(Congress) बालेकिल्ला असलेल्या लोकसभच्या मतदारसंघात भाजपने 2004 मध्ये पहिल्यांदा रुपाताई निलंगेकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या रुपाने लातूरला महिला खासदार मिळाल्या. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात कल्पना नरहिरे या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देत शिवसेनेने 2004 मध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

(Edited By - Mayur Ratnaparkhe )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT